मुंबई : हवामान विभागानं मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आज सायंकाळी दक्षिण मुंबईत पाऊस झाला. दक्षिण मुंबईत काल संध्याकाळी देखील ढग अचानक दाटून आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्यानं आजही मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 


दरम्यान, परतीच्या पावसानं अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.  राज्यभरात शुक्रवारी एका दिवसात वीज पडल्यानं राज्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.


एलफिन्स्टला पावसानंतर झालेली चेंगराचेंगरी आणि या आधी याच वर्षी दोन वेळेस मुंबापुरीत पाणी तुंबल्याने, पावसाविषयी मुंबईकर अधिक जागृक असतात.


राज्यातही यावर्षी पुणे आणि नाशिक शहराला पाण्याने झोडपले आहे. नाशिक आणि परिसरात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे की, त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणही अनेक वर्षांनी तुडूंब भरलं आहे.