मुंबई : मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामावरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलीय. मेट्रो-३ च्या कामादरम्यान होणाऱ्या आवाजासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय येत नाही तोवर ही स्थगिती कायम असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो-३ मुळे होणारं ध्वनी प्रदूषण आणि वृक्षतोडणीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. मेट्रो-३च्या कामादरम्यान ध्वनी प्रदूणाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आल्यानंतर न्यायालयाने रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रोच्या कामांवर बंदी घातली होती. उच्च न्यायालयाच्या बंदीनंतर मेट्रोच्या कामाचा वेग मंदावल्याचं लक्षात घेता एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाने  गठीत केलेल्या समितीकडे रात्री काम करण्याची परवानगी मागीतली होती.