आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? हायकोर्टाचा सवाल
आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय.
मुंबई : आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय.
पावसामुळे मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेत. अनेक ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. मुंबई आणि राज्यभरातील खड्ड्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करताना मुंबई उच्च न्यायालयानं आज प्रशासनाला हा संतप्त सवाल केला.
एखाद्या समितीचा अहवाल अभ्यास करण्यासाठी दुस-या सुपर समितीची नेमणूक करावी लागणे हे लज्जास्पद आहे असंही हायकोर्टानं म्हलंय.
खड्डे मुक्त रस्ते देणं हे सरकारचं काम आहे. पण ते होताना दिसत नाही, असंही हायकोर्टानं म्हटलंय. मुंबईसह राज्यभर खड्ड्यांची परिस्थिती सारखीच असल्याचा शेराही हायकोर्टानं मारला.