मुंबई : गुरुग्राममधल्या प्रद्युम्न हत्य़ा प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायन, ग्रेसी, ऑस्टटीन पिंटो यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. जोपर्यंत ही सुनावणी होत नाही, तोवर या तिघांना अटक करू नये असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळे रायनच्या व्यवस्थापनाला दिलासा मिळालाय.


रायन इंटरनॅशनलचे व्यवस्थापक मुंबईत राहात. दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये रायन इंटरनॅशनलच्याच एका शाळेत सात वर्षीय प्रद्युम्नची हत्या निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर रायनच्या शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेती पोल खोल झाली. 


कालच गुरुग्रामचे पोलीस दल पिंटो कुटुंबियांच्या चौकशीसाठी मुंबईत आलेत. त्यामुळे रायन, ऑगस्टीन, ग्रेसी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलाय. 


दरम्यान, शिक्षक परीषदेचे शिक्षण विभागाला पत्र धाडलंय. यात गुडगावच्या घटनेनंतर शाळांमध्ये उपाययोजना करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले. शाळांमध्ये सीसीटीव्ही लावावे, आर्थिक खर्च परवडत नसेल तर लोकप्रतिनिधींचा निधी द्यावा, बस चालक - सुरक्षा रक्षक यांची योग्य पडताळणी व्हावी, सुरक्षा समिती शाळेत असावी ज्यात पोलीस प्रतिनिधी असतील, अभ्यासक्रमात सुरक्षा विषयी धडे द्यावेत असे उपाय त्यात सुचवण्यात आलेत.