देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस सोशल मीडियावर राज ठाकरे यांचा मनसे कार्यकर्त्यांकडून 'हिंदू जननायक' असा उल्लेख. मनसेच पाहिल अधिवेशन २३ जानेवारीला पार पडल होत यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलला. मनसेनं प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती या नंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधण्यास सुरवात केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र राज यांच्या पसंतीस ही गोष्ट उतरली नाही त्यांनी कार्यकर्त्यांन सोबत झालेल्या बैठकीत हिंदू हृदय सम्राट बोलू नका अश्या सूचना केल्या होत्या अस असल तरी कार्यकर्ते आता हिंदू हृदय सम्राट म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करत नसले तरी हिंदूजननायक म्हणून राज यांचा उल्लेख सुरू झाला आहे आज राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्ट मधून हा उल्लेख पाहायला मिळतोय.



आज व्यापक हिंदुत्वाची आणि विकासाची भूमिका मांडणारे एकमेव नेते राज ठाकरे आहेत त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने हिंदूंचे नायक आहेत म्हणून आम्ही त्यांना हिंदू जननायक म्हणून संबोधतो अशी प्रतिक्रिया मनसे नाविक सेना युनियन चे कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी दिली आहे.


राज यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस आणि त्यांच्या कुटुबियांची आरोग्य तपासणी. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून कर्तव्य पार पडत आहेत. पण करोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित नवी मुंबईतील पोलिस आणि त्यांच्या कुटुबियांसाठी मनसे कडून आरोग्य तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आल होत.


पोलिस आणि त्यांचे कुटुंबिय हे नेहमीच मनसे आणि राज ठाकरे यांच्या जवळचे आहेत त्यामुळेच अहोरात्र मेहनत करणाऱ्या या पोलिस बांधव आणि त्यांच्या कुटुबियांसाठी अश्या पद्धतीच्या आरोग्य तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आल्याचे मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.