Holi 2023 : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी (Holi),धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. नियमावलीनुसार 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा त्याचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 135 नुसार कारवाई होणार आहे.


काय म्हटलंय नियमावलीत?


"होळी, धुलीवंदन, आणि रंगपंचमी सण 5 मार्च ते 11 मार्च 2023 या कालावधीत साजरा केला जात आहे. ज्याअर्थी सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लिल बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे," असे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी नियमावली जारी करत म्हटलं आहे.


हे नियम मोडाल तर होईल कारवाई


अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे


हावभाव किंवा नकलेचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे 


पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे


रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे