धनंजय मुंडे प्रकरणी हालचालिंना वेग, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
धनंजय मुंडेंवरील आरोपामागील महत्वाचं कारण काय?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला. या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागणार का? असा सवाल उठवण्यात आला. असं असतानाच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आरोपांबाबतचा तपास आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी या संदर्भात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार नाही असं राष्ट्रवादीने याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
पैसा किंवा संपत्तीच्या वादातून हे प्रकरण चव्हाट्यावर आलेलं नाही. तर मुंडेंचा राजकीय वारसदार कोण? (Who is the successor of Dhananjay Munde?) या वादातून हे महाभारत घडल्याची माहिती समोर आली आहे. महाभारत असो, रामायण असो, नाहीतर राजेराजवाड्यांचा इतिहास. गादीच्या वारसावरून घमासान घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
धनंजय मुंडे यांच्या घरातही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून कन्या पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता धनंजय मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून आतापासूनच संघर्ष पेटला आहे आणि त्याचीच धग धनंजय मुंडे यांना बसली आहे.
मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या करूणा शर्मा यांच्या बहिणीने म्हणजे रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप केले आहेत. पैशांसाठी हे ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा दावा स्वतः मुंडे यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
मुंडे यांचा परिवार
धनंजय मुंडे आणि पत्नी राजश्री यांना तीन मुली.
वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री.
हे सगळे मुंडेंसोबत परळीला राहतात.
तर करुणा शर्मांपासून मुंडेंना दोन मुलं झाली.
शिवाली ही मुलगी आणि शिव हा मुलगा.
हे तिघेजण मुंबईत राहतात.