मुंबई : जगभरात कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग वाढ आहे. भारतात देखील आतापर्यंत ६००हून अधिक कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ही पन्नाशीपार आहे तर राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची नोंद ही १२३ आहे. देशभरात आता 'लॉकडाऊन' आहे. पण पंतप्रधानांचे सगळे नियम नागरिक धाब्यावर बसवताना दिसत आहे. याकरता पोलीस नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या विषाणूंपासून सावध राहण्यासाठी प्रत्येकालाच घरी राहण्यास सांगितलं जात आहे. अशावेळी पोलीस मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरले आहे. अशावेळी पोलिसांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. 



आज आपण प्रत्येक लहान मुलाला कोरोनाची दहशत सांगून घरात बसवत आहोत. अशावेळी लहान मुलांच्या मनातही कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. अशावेळी आपला बाबा मात्र आपल्याला सोडून घराबाहेर जातो ही गोष्ट त्याच्यासाठी आणखी भितीदायक आहे. यासाठी हा मुलगा रडत आहे.


हा व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 'स्वत: ला धोक्यात घालून, आपल्या प्रियजनांनची काळजी बाजूला ठेवून नागरिकांची सुरक्षितता सांभाळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना माझी खूप खूप शाबासकी!' अशा शब्दात त्यांनी पोलिसांच कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ अतिशय बोलका असून वास्तवता मांडणारा आहे.