मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती गुन्हेगारांचा गराडा असलेला फोटो सध्या चर्चेत आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गृहमंत्र्याच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या फोटोवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच्या फोटोत कलीम कुरेशी, सय्यद मतीन तर जफर बिल्डर असे तीन आरोपी दिसत आहेत. यातील एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे.



दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची कारवाईही प्रस्तावित आहे. तर अन्य एकावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.



यापूर्वी आर आर पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो  समोर आला होता. त्यावेळी त्यांच्यावर देखील विरोधकांनी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला होता. आता गृहमंत्री गुन्हेगारांमध्येच असल्याचा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय. 



दरम्यान दौऱ्यावर असताना हजारोजण भेटायला येत असतात. तेव्हा ते फोटो देखील काढतात असं स्पष्टीकरण अनिल देशमुखांनी दिलंय.