मुंबई : राज्याच्या धर्मदाय आयुक्तांच्या पुढाकारानं येत्या तीन डिसेंबरला रुग्णालयंच तुमच्या दारी येणार आहेत. गरीबांचंही आरोग्य उत्तम राहायला हवं, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मदाय आयुक्तांच्या पुढाकारानं मुंबईत नुकताच एक उपक्रम पार पडला. 'धर्मदाय रुग्णालयं गरिबांच्या दारी' या उपक्रमात मुंबईतल्या नामांकित हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी रस्त्यावर जाऊन गरिबांच्या आरोग्याची तपासणी केली.


मुंबईतल्या 74 धर्मदाय रुग्णालयांतल्या डॉक्टर्सनी मिळून एका दिवसात 11 हजार रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर औषधोपचार केले. मुंबईतल्या या प्रतिसादानंतर आता येत्या तीन डिसेंबरला राज्यभर हे अभियान राबवलं जाणार आहे.


राज्यातल्या धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत किंवा नाममात्र शुल्कासह उपचार करण्याची सोय आहे. त्याचाही लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना घेता येईल. गरजू आणि गरीबांनी याचा जरूर लाभ घ्या. तुमच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकत सुरू केलेलं हे अभियान आहे, त्याला प्रतिसाद द्या.