मुंबई : अन्न आणि इतर सुविधा पसंत न आल्याने एका ग्राहकाने सर्व्हिस चार्ज रिटर्न मागितला पण रेस्टॉरंट मालकाने तो देण्यास साफ नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरुन मोठा गदारोळ झाला. पण रेस्टॉरंटमालकाला याचा भुर्दंड भरावा लागला.


ग्राहक मंचात धाव 


टेलमधील सुविधा न आवडल्याने ग्राहक आय.पी.एस अधिकारी जय जीत सिंह यांनी १८१.५ एवढा सर्व्हिस रिटर्न मागितला.


पण रेस्टॉरंट मालकाने तो देण्यास साफ नकार दर्शवला. सिंह यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.


ग्राहक मंचाचा आदेश 


 ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशानुसार लोअर परेलमधील ग्रील रेस्टॉरन्टला हा भूर्दंड भरावा लागला.


आयपीएस अधिकारी जय जीत सिंह यांना नुकसान भरपाई म्हणून १०,१८२ रुपये देण्याचा आदेश दिला.


पासवान यांची घोषणा 


अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.


एप्रिल महिन्यापासून रेस्टॉरन्टच्या बीलवर सर्विस चार्ज आकारण हे पूर्णपणे स्वैच्छिक असून ते अनिवार्य नाही. 


या वर्षाच्या सुरुवातीला सिंह यांनी केंद्रीय जिल्हा ग्राहक मंचात १८१० रुपयांचे बील दिले, ज्यामध्ये १० टक्के सर्व्हिस टॅक्स जोडला होता. 


पॉलिसीचा संदर्भ 


बीलमध्ये दिल्याप्रमाणे अन्न आणि सुविधा त्यांना मिळाल्या नसल्याचे सिंह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. त्यामूळे त्यांनी सर्व्हिस चार्ज रिटर्न मागितला.


पण रिफायनान्स मॅनेजमेंट कंपनीच्या पॉलिसीचा संदर्भ देत त्यांनी सर्व्हिस चार्ज रिटर्न करण्यास नकार दिला. 


कायद्याची मदत 


 'या घटनेनंतर मी कायद्याची मदत घेण्याचे ठरविले आणि ग्राहक मंचात जाऊन सर्व्हिस चार्ज संबधी दाद मागितली असे सिंह यांनी सांगितले.