अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात भाजपचच सरकार येईल असा विश्वास  भाजप नेते रोजच व्यक्त  करत आहेत. त्यामुळे भाजप हा चमत्कार कसा घडवणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाशिवआघाडीनं सत्तास्थापनेच्या दृष्टीनं पावल टाकली असतानाही चंद्रकांत पाटलांचा हा दावा नेमका कोणत्या आधारे आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण भाजपकडे ११९ आमदारांचं  बळ असलं तरी सत्तास्थापनेसाठी १४५ आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. ते जमवण्यासाठी  त्यांना शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा लागेल. अन्यथा अन्य  पक्षांती ल २६ आमदारांना गळाला लावावे लागेल. 


नारायण राणेंनी तसे संकेत दिले असले, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फोडणे सोपं नाही. तरीही भाजप नेते सत्तास्थापनेचा दावा कोणत्या आधारावर करत आहेत?


म्हणजे आघाडीत  बिनसलं तर सत्तास्थापन करण्याचा  भाजपचा  प्लान असू  शकतो. तसं   झालं  तर शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवणार की पुन्हा निवडणुकीला  समोर  जाणार हा प्रश्न आहे. 


किंवा पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या डावपेचांवर आणि मुत्सद्देगिरीवर भाजप नेत्यांचा  अजूनही विश्वास  असावा. त्यामुळे महाशिवआघाडीचं जुळत नाही तोपर्यंत भाजप श्रेष्ठी चमत्कार करू शकतात अशी नेत्यांना आशा असावी.


शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांवर आयकर विभागाने टाकलेले छापे आणि त्याचं टायमिंग याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 


भाजपा महाशिवआघाडीत बिघाडी करू शकेल का ? आणि भाजपनं चमत्कार घडवण्यासाठी तसे डाव टाकले आहेत का? याबाबतची उत्सुकता म्हणूनच वाढली आहे.