Viral Video : रस्त्यावर मिळणारे आणि जीभेचे चोचले पुरवणारे अनेक खाद्यपदार्थ चवीनं खाल्ले जातात. अशा या खाद्यपदार्थांमध्ये अनेकांच्याच आवडीची एक गोष्ट म्हणजे वडापाव. परदेशी पाहुण्यांच्या अनुषंगानं इंडियन बर्गर. बटाट्याची पिवळी भाजी, त्याचा लहानसा बेसनात बुडवून तळलेला खमंग वडा आणि सोबत दिला जाणारा नरम पाव ही जोडी म्हणजे क्या बात!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजमितीस या पदार्थानं फक्त मुंबई आणि महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशातही कमाल लोकप्रियता मिळवली आहे. अशा या वडापावनं कित्येकांच्या कुटुंबांनाही आधार दिला. एकट्या मुंबईतच वडापावचे असंख्य स्टॉल असून, प्रत्येक स्टॉलची एक वेगळी कथा, कहाणी. हाच वडापाव एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे आर्थिक सुबत्ता देऊ शकतो माहितीये? 


sarthaksachdevva या एका इन्फ्लुएन्सरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका वडापावच्या गाड्यावर उभा राहून वडापाव विकताना दिसत आहे. सकाळपासून दुपार आणि संध्याकाळपर्यंत तो तिथं वडापावच विकतोय आणि सोबतच ग्राहकांची गर्दी, तिथं कमीजास्त असणारी वर्दळ असं सर्वच वर्णन तो करताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : लग्नही होतं अन् हनिमूनही... मात्र चार दिवसातच होतो घटस्फोट; कुठे फोफावतोय Pleasure Marriage चा ट्रेंड 


व्हिडीओ जसजसा पुढे जातोय तसतसा तो आणखी रंजक होतोय, कारण तिथं या युट्यूबरनं वडापावच्या माध्यमातून महिन्याला साधारण किती कमाई करता येते याचा एक आकडाही सर्वांपुढं मांडला आहे. ही आकडेवारी काय सांगते पाहूनच घ्या... 


एक वडापाव 15 रुपये. त्याप्रमाणे अडीच तासांमध्ये जवळपास 200 वडापाव विकले गेले. दिवसभरात एकूण 622 वडापाव विकले गेले, म्हणजेच अंदाजे 9300 रुपयांची कमाई झाली. महिन्याला हा आकडा पोहोचतो 280000 रुपयांवर आणि त्यातून कच्च्या मालासाठीचा खर्च वजा केला तर महिन्याला हाती येणारा निव्वळ नफा आहे 2 लाख रुपये. वर्षभर ग्राहकांची अशीच गर्दी राहिली तर नफ्याचा वार्षिक आकडा पोहोचतो 24 लाख रुपयांवर. काय मग, डोकं चक्रावलं ना? 



कॉर्पोरेट क्षेत्र असो किंवा सरकारी नोकरी, तिथंही अनकेदा इतकी कमाई करणं जवळपास अशक्य. त्यामुळं हा Reel सध्या सोशल मीडियावर तूफान कामगिरी करताना दिसत आहे. यावर येणाऱ्या कमेंटही भन्नाट असून, आम्ही इथं काय करतोय....? असाच प्रश्न कॉर्पोरेट कर्मचारी स्वत:ला विचारत आहेत.