मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सीजनची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. राज्यात सध्या कशा प्रकारे ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे. 
 
- जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे


- केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश


- राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता. 


- आजच्या घडीला खालीलप्रमाणे इतर राज्यांतून ऑक्सिजन पुरवठा


भिलाई, छत्तीसगड १०० टन (Actual allocation १३०) 
बेल्लारी कर्नाटक १०० टन (Actual allocation १४०) 
रिलायन्स, गुजरात १०० टन (Actual allocation १२५)


केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे.   


विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा १०० टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.


हवेतून ऑक्सिजन तयार करणे


- हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रात बसविणे सुरु आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये हे प्लांट असतील.


- एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो.


- मुंबई महापालिका १२ रुग्‍णालयांमध्‍ये १६ ऑक्सिजन प्‍लांट उभारत आहे. या सर्व १६ प्रकल्‍पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे.


- ३५ जिल्ह्यांतून ३०९ प्लांट्सपैकी  २१ कार्यरत. २७ मेट्रिक टन पुरवठा सुरु आहे. २८० प्रस्तावित. लवकरच ३५१ मेट्रिक टन पुरवठा सुरु होईल. १९००० बेड्सना ऑक्सिजन देणे शक्य होईल.


ऑक्सिजन थेट जम्बो कोविड सेंटर्सना


- महाजेनकोच्या खापरखेडा, अकोला आणि परळी येथील केंद्रानजीक मोठ्या प्रमाणावर जम्बो सुविधा उभारण्यात येत असून त्याठिकाणी थेट रुग्णांना ऑक्सिजन मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे. 


- रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाजवळ जम्बो केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे.


- पेनमधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयात लवकरच जम्बो कोविड सेंटर सुरु होत आहे 


- लॉंयड स्टील, वर्धा परिसरात १००० बेड्सची जम्बो सुविधा उभारणार