कशी थोडक्यात बचावली ही महिला पाहा...२ सेकंदही जीव जाण्यास पुरेसे होते
एक घटना मुंबईच्या विक्रोळी भागातील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मुंबई : तौत्के वादळामुळे भारताच्या अनेक भागांमध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. हे वादळ अरबी समुद्रात आल्यामुळे समुद्रा लगतच्या भागांना यामुळे जास्त प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. मुंबई समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ असल्याने मुंबईमध्येही या वादळामुळे बरेच नुकसान झाले आहे. तसेच बर्याच भागात झाडे पडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईच्या विक्रोळी भागातील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंबईच्या विक्रोळी भागात वादळामुळे एक झाड कोसळलं आहे. या घटनेत तसे कोणीही जखमी झाले नाही, परंतु या मध्ये एक महिला मरता मरता वाचली आहे.
अगदी काही सेकंदाच्या फरकाने तिचा जीव वाचला आहे. ती महिला वेळेत त्या झाडा खालून बाजूला झाली आणि तिचे प्राण वाचले आहे.
अरबी समुद्रावरून उठलेल्या या वादळामुळे मुंबईत खूप नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील कोकण भागात तीव्र चक्रीवादळामुळे वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या वादळामुळे दोन नौका समुद्रात बुडल्याने सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर तीन खलाशी बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यात या वादळामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका बोट चालकाचे प्राण गेले आहे. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई आणि उल्हासनगर येथे झाडे पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत पावसाने तोडला रेकॅार्ड
मुंबईत अनेक भागात पाणी साचले आहे. त्याचबरोबर झाडे आणि दगड पडल्यामुळे प्रचंड नुकसान देखील झालं आहे. वादळामुळे मुंबईतील खार भागात होर्डिंग्ज कोसळली. काही ठिकाणी भुयारी मार्गात पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबईचा प्रसिद्ध वांद्रे-वरळी समुद्री मार्ग दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत या तौत्के वादळामुळे मे महिन्यात 230 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हवामान तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात पावसाने 24 तासात सर्वाधिक रेकॉर्ड केला आहे.