मुंबई : 'लोकल' ही मुंबईची लाईफलाइन समजली जाते. मुंबईचं ट्राफिक आणि वेग याचा विचार केला तर रेल्वे प्रवास हा अनेकांसाठी आरामदायी आणि वेगवाग वाटतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य चाकरमणी असो किंवा सेलिब्रिटी .. अनेकांना वेळेत त्यांच्या इच्छितस्थळी पोहचवण्यासाठी रेल्वेप्रवासाइतका वेगवाग प्रवास नाही. पण अनेकदा रेल्वेच्या तिकीटासाठी लांबच लांब रांगा लावणं कंटाळवाणं आहे. पण आता यामधून तुमची सुटका होऊ शकते. 


स्मार्टफोन आणि इंटरनेटची सेवा असणार्‍यांना अवघ्या एका क्लिकवर रेल्वेची तिकीट काढणं सोप्पे आहे. 



काय आहे आवश्यक ? 


तुमच्या मोबाईलमध्ये UTS हे अ‍ॅप डाऊनलोड करा. 
त्यामध्ये तुमचं अकाऊंट बनवा. पासवर्ड सेट करून लक्षात ठेवा. पुढल्यावेळेस लॉग ईन करणं सोप्पे होईल. 
ऑनलाईन तिकिट बुक करताना तुम्हांला आधारकार्ड, पॅन कार्ड अशा एका सरकारमान्य ओळखपत्राची माहिती देणं बंधनकारक आहे. 



मोबाईलवर कशी काढाल मुंबई लोकलची तिकीट ? 


तुमचं अकाऊंट बनवल्यानंतर पासवर्ड टाकून ते अकाऊंट पुन्हा ओपन करता येतं. 
तिकीट बुक करताना रेल्वेस्थानकापासून काही अंतर दूर उभे रहा. तुमचा फोन जीपीएसच्या माध्यमातून ट्रॅक होत असतो. 
त्यानंतर कोठून कोठे प्रवास करायचा आहे त्या स्थानकाची माहिती द्या. 
प्रवास सिंगल की रिटर्न ? क्लास कोणता? किती तिकिटं ? ( कमाल मर्यादा 4 आहे)  याची माहिती भरा.  
तुम्ही ऑनलाईन व्हॉलेट किंवा आर व्हॉलेटमध्ये पैसे भरून तिकीटाची रक्कम भरू शकता.  
तिकिटाची बुकिंग झाल्यानंतर तुम्ही त्यांची प्रिंट घेऊ शकता किंवा थेट मोबाईलमध्येच तिकिट सेव्ह ठेवू शक्ता. 
रेल्वेने काही स्थानकांवर मोबाईलवर बुक केलेल्या तिकिटांची प्रिंट काढण्यासाठी उपकरणं बसवली आहेत. 


लोकल तिकिटाप्रमाणे सिझनल तिकीटही उपलब्ध 


मुंबई लोकलच्या तिकिटाप्रमाणेच सिझनल तिकीटही बुक करू शकता. यामुळे आता रेल्वे पासही अवघ्या एका क्लिकवर म्हणजेच केवळ 5-10 मिनिटांत बुक करू शकाल.