मुंबई : भाजप नेते विशेषतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यात पोलखोल सभा घेत आहेत. या पोलखोल सभेतून ते आघाडी सरकार प्रामुख्याने शिवसेनेवर टीका करत आहेत. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी यावरून फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना आता काही काम नाही. कोणतीही विकास कामे करायची नाहीत. काही कार्यक्रम नाहीत. त्याचे उदर भरण हे शिवसेनेच्या टीकेवरच चालू आहे. त्यामुळे त्याचे जे काही चालले आहे ते चालू दे, असा टोला त्यांनी लगावला.


हे पोल खोल यात्रा करत आहेत. कसली पोळ आणि कसली खोल यांच्या बैलाला ढोल. यांची तर आम्ही मुंजच करणार आहोत. नागपूर, पुणे महानगरपालिकेत यांनी केलेला भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत. नागपूर मनपात केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचा प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे. या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.