या 7 गोष्टी कराल तर ओमायक्रॉन तुमच्या जवळही फिरकणार नाही
कोरोनापासून असा करा स्वतःचा बचाव
मुंबई : भारतसह जगभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉनचा धोका देखील आता वाढत आहे. संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. असं असताना कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. या दरम्यान कोरोना आणि ओमायक्रॉनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या 7 महत्वाच्या गाईडलाईन फॉलो करा.
पाऊल जपून टाकणं महत्वाचं
ओमायक्रॉनचा धोका सर्वाधिक वाढत आहे, सोबतच नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू आहे. अशावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र जास्त मेहनत करावी लागत आहे. त्यांच्यावर अधिकचा भार येऊ नये म्हणून सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.
1. बाहेर निघताना मास्कचा वापर करावा
मास्क घातल्यावर कोरोना पसरण्याची भीती कमी असते. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर जरूर करा. कोविडपासून स्वतःला रोखण्यासाठी मास्क अत्यंत महत्वाचा आहे.
2. सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचे
मास्क वापरण्यासोबतच सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवेळी कोरोनाचा धोका वाढू शकतो. स्वतःची काळजी घेण्याकरता मास्कचा वापर करा.
3. हात स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे
कोरोना व्हायरसपासून स्वतःला रोखण्यासाठी हात स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा. पाणी नसेल तर सॅनिटाइजरचा वापर करा.
4. शक्य असेल तर घरातूनच काम करा
कोरोनाचा धोका रोखण्यासाठी घराबाहेर जाणं टाळा. याकरता शक्य असल्यास घरातूनच काम करा. तसेच भाजी किंवा घरातील अन्य आवश्यक पदार्थ ऑनलाईन मागणे शक्य असल्याच त्याच पर्यायाचा वापर करा.
5. कुणासोबतही काहीही शेअर करण्यापूर्वी विचार करा
कोरोनाचा धोका वाढत आहे. असं असताना महामारीपासून वाचण्यासाठी कुणासोबही कोणताच पदार्थ किंवा वस्तू शेअर करणं टाळा.
6. कोरोनाची लक्षणे दिसल्यास आयसोलेशनमध्ये राहा
तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसल्यास अथवा तुमचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये राहा. कोरोना व्हॅक्सिनचे दोन डोस झाले असूनही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. सर्दी, खोकला, ताप आणि वास न येणे ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
7. लवकरात लवकर कोरोना लसीचे दोन डोस घ्या
कोरोनापासून स्वतःला रोखण्यासाठी लस अत्यंत महत्वाची आहे. लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. दोन्ही डोस वेळेवर घ्या. लस घेतल्यामुळे कोरोनाचा धोका कमी आहे.