मुंबई : धुळीच्या वादळामुळे राज्यातील अनेक भागातील पारा घसरला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडलीये. निफाडचा पारा तर 5.5 अंशावर गेला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, महाबळेश्वरमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आधीच व्हायरल ताप, खोकला आणि सर्दी त्यासोबत वाढणारी थंडी आणि धुळीमुळे आलेलं मळभ यामुळे रोगराई वाढू शकते. 



कशी घ्यावी काळजी? झी 24 तासशी बोलताना डॉ. कृष्णकांत डेबरी यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. दमा, ब्लड प्रेशर, डायबेटीस असलेल्या रुग्णांना जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करा. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढू शकतात.


वृद्ध नागरिक, गर्भवती महिलांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर जाणं टाळा, सर्दी खोकला याची लक्षणं दिसल्यानंतर टाळाटाळ करू नका. तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. न्यूमोनियाचा धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि हलगर्जीपणा करू नका. 


पाकिस्तानच्या वादळामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. पाकिस्तानातून आलेल्या वादळासोबत मुंबईत वाळूचे कणही आलेले आहेत. 


याचा दृश्यमानतेवरही परिणाम झाला असून हवेतल्या धुळीच्या कणांमुळे दीर्घकाळ परिणाम जाणवणार आहे. याचा मुंबईतल्या नागरिकांच्या श्वसनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. याच वादळाचा हवामानावरही परिणाम झाला असून मुंबईतलं तापमान कमालीची घट झाली आहे.