मुंबई : सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलीय. डॉक्टर दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्था असल्याचा संशय आहे.... या संस्थेचे अध्यक्ष ज्या पद्धतीनं बोलतात आणि लोकांना प्रशिक्षण देतात, त्यावरुन ही संस्था दहशतवादी असल्याचं स्पष्ट होतं, असं दलवाई म्हणाले. त्यावर सिमीसारखी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भीमा कोरेगांव प्रकरणी संभाजी भिडे यांची चौकशी होणे गरजेचं असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता हुसेन दलवाई यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येतील असे विधान मंत्री नितीन राऊत यांनी केले होते. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात याचे हिंसक पडसाद उमटले होते. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे ठाकरे सरकार इतक्या तातडीने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.