मुंबई : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्या पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं आहे. शिवसेनेचा कोणी ही फुटला नाही. राष्ट्रवादी, काँग्रेसचे काही लोकं फुटले. मुख्यमंत्री याबाबत खुलासा करतील. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे ती जाहीरपणे बोलता येत नाही. मी राजीनामा दिलेला नाही. मी समाधानी आहे. मी उद्या पुन्हा मातोश्रीवर येणार आहे. मंत्रालय दिलं आहे त्याचा सन्मान करत मी जबाबदारीने ते पार पाडेल असं देखील सत्तार यांनी यावेळी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या राजीनाम्याची अफवा कोणी पसरवली याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्षपदी महाविकासआघाडीचा पराभव का झाला याबाबत ची माहिती ही मुख्यंत्र्यांना दिली.


विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये असलेले सत्तार हे भाजपच्या जवळ आले होते. पण भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत आल्यानंतर अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. त्यांना राज्यमंत्रीपद ही मिळालं त्यामुळे काही स्थानिक नेते नाराज आहेत. असं देखील बोललं जात आहे.


काल अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. पण आता सत्तार यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. पण अब्दुल सत्तार हे गद्दार असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार चंद्राकांत खैरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेचे नेते आणि सत्तार यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.