भाजपशी माझा संबंध केवळ निवडणुकीपुरता- रामदास आठवले
तो निर्णय माझा एकट्याचा नाही.
कल्याण: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) भूमिकेशी माझा कोणताही संबंध नाही. मी केवळ निवडणुकीचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून त्यांना साथ देत असल्याचे वक्तव्य रिपाईप्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते रविवारी अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलत होते. भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. त्यामुळे मी भाजपला सामील झालो आहे, असा गैरसमज पसरवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. मी केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरता त्यांच्यासोबत आहे. समाजातील प्राध्यापक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी बैठका घेऊनच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय माझा एकट्याचा नाही. यापुढेही सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे आठवले यांनी सांगितले.
भारिप -एमआयएम युतीचा फायदा भाजप-आरपीआयलाच - रामदास आठवले
काही महिन्यांपूर्वी रिपाईने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मध्य मुंबईतून भाजप-आरपीआय युतीचा उमेदवार म्हणून रामदास आठवले यांच्या नावाची घोषणा केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने युती केली होती. त्यावेळी शिवसेनेचे राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. एकीकडे भाजपकडून युतीसाठी सेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शिवसेना नेतृत्व स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे रिपाईची बैठक आणि आठवलेंच्या घोषणेआडून भाजपाची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा सुरु आहे.