मुंबई : Shiv Sena leader Yashwant Jadhav 40 properties Seized : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात पाच कोटी रुपयांचा वांद्रे येथील प्लॅटचा समावेश आहे. आतापर्यंतची आयकर विभागाची ही मोठी कारवाई आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. (I-T dept attaches 40 properties linked to Shiv Sena leader Yeshwant Jadhav)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या 40 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कोणत्या ठिकाणी यशवंत जाधवांचे फ्लॅट्स आहेत? किती कोटींच्या मालमत्ता आहेत, अशी चर्चा होताना दिसत आहे. यशवंत जाधव यांच्या मालमत्ता जास्त असल्याची माहिती आता पुढे येत आहे. आयकर विभागाकडून जाधव यांच्या 40 मालमत्तांवर टाच आणली गेली आहे. वांद्रेतील 5 कोटींच्या फ्लॅटसह भायखळ्यातील 31 फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत.


यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाने जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या कथित 40 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मालमत्तांमध्ये भायखळ्यातील एका इमारतीमधील 31 फ्लॅट, वांद्रे येथे पाच कोटी किमतीचा एक फ्लॅट यांचा समावेश आहे. जाधव यांनी न्यूजहॉक मल्टिमिडीया प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार बिमल अग्रवाल यांच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून मालमत्ता, त्यांच्या सासू सुनंदा मोहिते यांच्या नावावर हॉटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या नावे इतर मालमत्ता खरेदी केल्या होत्या.