मुंबई :   बँकांच्या ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
 
यासाठी खातेदाराची क्रेडीट लिमीट बँक तपासणार आहे. त्याकरिता ‘सिबिल’कडी नोंदींचा आधार घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी एटीएमद्वारे रोकड काढली अथवा खात्यातील जमा रक्कम तपासली की, पात्र कर्जाच्या रकमेचा पर्याय  दर्शविला  जाणार आहे. खातेदाराला हे कर्ज हवे आहे काय, याची मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रोसेस फी आदी एटीएमच्या माध्यमातूनच भरावे लागणार आहे.


अन्य खासगी बँकांच्या या धर्तीच्या सुविधा असल्या तरी पाच वर्षे मुदतीचे कमाल १५ लाख रुपयांचे कर्ज प्रथमच अशा तऱ्हेने दिले जात असल्याचा आयसीआयसीआय बँकेचा दावा आहे. हे कर्ज वार्षिक १०.९९ ते २२ टक्के या दरम्यान व्याज दराने दिले जाणार आहे.