मुंबई :  राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांचा बंडखोर गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट एकमेकांसमोर आले आहेत. राजकीय उलथापालथ सुरु असतानाही मुख्यमंत्री कोरोनाबाबत सतर्क आहेत. मुख्यमंत्री सत्तासंघर्षाच्या या काळात कोरोनाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. (if corona incresd in state will mask compulsion be applied cm uddhav thackeray give order to officers in meeting) 


लोकलमध्ये मास्कसक्ती करण्याचा विचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची कोरोना आढावा बैठक घेतली. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यास मास्क सक्ती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच लोकलमध्ये मास्कसक्ती करण्याचा विचारही केला जातोय. सत्ता परिवर्तनाच्या घोळाकडे लक्ष देऊ नका.  त्याचा परिणाम शासकीय कामावर न होऊ देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनीही दिले.


राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना दैनंदिन रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळतेय. मात्र मागील काही आठवड्यांमधील कोरोनाचा आकडा पाहिल्यास सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी लॉकडाऊन करावा लागला होता. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे आता पुन्हा निर्बंधाची वेळ ओढावू नये यासाठी प्रशासन आणि सर्वच संबंधित विभाग सतर्क झाले आहेत.