मुंबई :  राज्य शासनाकडून (Maharashtra Government) घोषित करण्यात आलेला आनंदाचा शिधा गोरगरिबांना ऑनलाईन मिळणार नाही. राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali 2022) गोरगरिबांना फराळासाठी लागणाऱ्या 5 पदार्थांचं कीट अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळी सुरु होऊनही सर्वसामांन्यांना दिवाळी कीट मिळालेली नाही. तसेच पॅकेजिंगमुळे हे कीट पोहचण्यास उशीर झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आता हे कीट ऑनलाईन मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. (if techniqal error for online distribuation diwali kit they will be distribut offline cm eknath shinde order to food and drug administration)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चणाडाळ तर एक किलो पामतेल याचा समावेश आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी हे कीट पोहचलेलं नाही. या कीटचं ऑनलाईन पद्धतीने नोंद करुन वाटप करण्यात येणार होतं.  मात्र जिथे हे कीट पोहचलंय तिथे ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण येत आहे. 


यामुळे आता ऑनलाईन शिधा मिळायला अडचणी आल्यास ऑफलाईन पद्धतीनं शिधा मिळणार आहे.  ऑफलाईन पद्धतीनं दिवाळी कीट देण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला दिले आहेत. शिधापत्रिका पाहून शिधा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.