मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक 1 करण्यात आलं आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉक होताच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. त्यामुळे गर्दी झाली तर पुन्हा एकदा नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येणार आहे. परंतु संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे विनाकारण गर्दी करु नका. मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करु नका. गर्दी होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कुठेही गर्दी होता कामा नये, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 


'काही विषय ऐनवेळी येतात,' मंत्री-मुख्य सचिव वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण


महाराष्ट्रातील जनता सरकारचं ऐकते आहे. सरकार जनतेसाठीच ही पाऊलं उचलत असल्याचं जनता जाणते. आतापर्यंत लोकांनी सहकार्य केलं आहे. यापुढेदेखील जनता सरकारच्या सर्व सूचनांचं पालन करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.


'निसर्ग'च्या प्रकोपात घरांची पडझड झालेल्यांना मिळणार इतकी आर्थिक मदत