IIT Bombay Campus Placements: अभियांत्रीकी क्षेत्रामध्ये भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) अर्थात आयआयटी संस्थांची बरीच चर्चा असते. इथं प्रवेश मिळण्यापासून इथून शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवण्यापर्यंतचा अनेकांचाच प्रवास हेवा वाटण्याजोगा आहे. अशा या आयआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळणं हीसुद्धा लहान बाब नाही, कारण इथूनच पुढे तुमच्या उज्ज्वल भवितव्याला सुरुवात होते असं अनेकजण म्हणतात आणि ही अतिशयोक्ती ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्येसुद्धा आआयटीतील विद्यार्थ्यांना घसघशीत पगाराची नोकरी मिळाली असून, तब्बल 63 जणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळं यावर शिक्कामोर्तबच झालं आहे. 


85 विद्यार्थ्यांना 1 कोटींचं पॅकेज? 


वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी IIT Bombay च्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी अनेक मोठ्या कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांनी Interview दिले होते. ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आलेल्या या Interview मध्ये जवळपास 85 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांच्या घसघशीत पॅकेजची नोकरी मिळाली आहे. तर, जवळपास 63 विद्यार्थ्यांची निवड International Placement साठी झाली आहे. 


हेसुद्धा वाचा : घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय


शैक्षणिक संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार टॉप रिक्रूटर एक्सेंचर, एयरबस, एयर इंडिया, एप्पल, आर्थर डी. लिटिल, बजाज, बार्कलेज, कोहेसिटी, दा विंची, डीएचएल, फुलर्टन, फ्यूचर फर्स्ट, जीई-आईटीसी वैश्विक ऊर्जा आणि गुगल या आणि अशा इतर काही कंपन्या या कॅम्पस प्लेसमेंटचा भाग होत्या. त्याशिवाय, आईसीआईसीआई-लोम्बार्ड, आयमहिंद्रा ग्रुप, माइक्रोन, माइक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टेनली, मर्सिडीज-बेंज, एलएंडटी, एनके, ओला क्वालकॉम, रिलायंस ग्रुप, सैमसंग, डियाफोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल, जगुआर, लँड रोवर, जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू, कोटक सिक्युरिटीज या संस्थाही प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. 


यंदाच्या वर्षी आयआयटीमध्ये सर्वाधिक जॉब प्लेसमेंट इंजिनिअरिंग, टेक्नोलॉजी (सरासरी पगार 21.88 लाख रुपये), कम्यूनिकेशन टेक्नोलॉजी/सॉफ्टवेयर (26.35 लाख रुपये), फायनान्स बँकिंग/ फिनटेक (32.38 लाख रुपये), मॅनेजमेंट कंस्लटिंग(18.68 लाख रुपये) या कोर्सचा समावेश होता. डेटा सायन्स अँड अॅनालिटिक्स, रिसर्च एंड डेवलपमेंट (36.94 लाख रुपये), डिज़ाइन (सरासरी 24.02 लाख रुपये) इतक्या पगाराची हमी विद्यार्थ्यांना देण्यात आली. परदेशी प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर, हाँगकाँग अशा देशांतून ऑफर्स मिळाल्या.