वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला
बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई केल्यानंतर आज कित्येक वर्षानंतर वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागलाय.
मुंबई : बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई केल्यानंतर आज कित्येक वर्षानंतर वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागलाय.
मुंबईतल्या वडाळा आणि शिवडी हद्दीतला चार रस्ता म्हणून प्रसिद्द असलेल्या रफी अहमद किडवई मार्गावरचा रस्ता क्रमांक दोन आणि रस्ता क्रमांक तीनवर वर्षानुवर्षं सुरू असणारं अनधिकृत पार्किंग अखेर हटलं आहे.
वाहतूक विभाग आणि रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात हे इथलं कायमचंच चित्र असायचं. आता रस्ते मोकळे झाल्यानं वाहतूकही सुरळीत झाली आहे. त्यामुळे स्थानिक, तसंच सामाजिक संस्थांनी पोलिसांचं कौतुक केलंय.