बिल्डिंगचा पुनर्विकास रखडलेल्यांसाठीअपडेट; महारेराकडून ग्राहकांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय
गृहनिर्माण प्रकल्पाचा विकास रखडल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून येत असतात. याबाबत महारेराकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पाचा विकास रखडल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून येत असतात. याबाबत महारेराकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नुकताच महारेराने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गृहप्रकल्प रखडल्यास गुंतवणूकदारही जबाबदार राहणारा आहे. असा निर्णय महारेराकडून ग्राहकांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. गृहनिर्मिती प्रकल्पास विलंब झाला, प्रकल्प रखडला तर कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत.
अशावेळी ग्राहक आणि विकासक अडचणीत येतात. पण आता गुंतवणूकदार ही 'प्रवर्तक' असतील, असा महत्वपूर्ण आदेश महारेराने नुकताच दिला. त्यामुळे यापुढे प्रकल्पास विलंब झाला वा प्रकल्प रखडला तर गुंतवणूकदारही जबाबदार राहणार आहेत.