दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकेकाळी गैरव्यवहाराने बदनाम झालेल्या राज्य सहकारी बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाली असून महाराष्ट्र बँकेच्या बरोबरीने राज्य सहकारी बँकेकडे ठेवी जमा झाल्या आहेत. बँकेच्या स्थापनेपासून 108 वर्षात पहिल्यांदा बँकेत उच्चांकी 35 हजार 540 कोटींची उलाढाल झाल्याचा दावा बँकेवर असलेल्या प्रशासक मंडळाने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सहकारी बँकेवर प्रशासक मंडळ आल्यापासून बँकेच्या कारभारात सुधारणा झाली असून रिझर्व्ह बॅंकेचे सर्व निकष बँकेने पूर्ण केले आहेत. मागील दोन वर्षात बँकेने एकाही थकबाकीदार साखर कारखान्याची विक्री केली नसून सात कारखाने भाड्याने दिले आहेत. पूर्वी राज्य सहकारी बँक जिल्हा बँका आणि साखर कारखान्यांपूर्ती सिमीत होती. आता इतर सहकारी संस्थांचा सहभाग वाढला आहे. 31 मार्च 2019 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेने 316 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.