कोरोनाचा धोका वाढला, ‘रेमडेसिवीर’च्या किमती केल्या कमी
राज्यात करोना (Coronavirus) पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने करोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या (Remdesivir) किमती कमी केल्या आहेत.
मुंबई : राज्यात करोना (Coronavirus) पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने करोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या (Remdesivir) किमती कमी केल्या आहेत. 4500 ते 5400 रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता 1200 ते 1800 रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांत उपलब्ध होत आहे. मुंबईतील रुग्णालये अजूनही ‘एफडीए’च्या ‘विनंती’बाबत आडमुठे धोरण अवलंबत असली तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किमती कमी करतील, असा विश्वास ‘एफडीए’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.
राज्यातही कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहेत. लोक लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना खुलआम फिरताना दिसत आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे 25हजारांहून अधिक रूग्ण वाढले आहे. तर, सध्या राज्यात 1 कोटी 77 हजार 560 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत आजपर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली आहे.
दरम्यान, कोरोनाची रुग्ण संख्येत होणारी वाढ आणि नियमांचा फाटा देण्यात येण्यात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे. वेळप्रसंगणी कडक लॉकडाऊन लावावे लागेल. कृपया नियमांचे पालन करा. मास्क वापरा, हात साबणाने स्वच्छ धुवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं काही नियमावली जाहीर केलीय. राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशांमध्ये म्हटले आहे.