मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणि दखल न घेण्याइतकी होती. मात्र आता रुग्णसंख्या वाढतेय. कोरोनानंतर मुंबईकरांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीये. कारण मुंबईत साथीच्या आजारांचाही धोका वाढला आहे. (increase in malaria and gastro patients after corona virus in mumbai)
 
कोरोनापाठोपाठ मुंबईत अन्य साथीच्या आजारांचा धोकाही वाढलाय. शहरात गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालीये. गेल्या महिन्याभरात गॅस्ट्रोचे 708 तर मलेरियाचे 291 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे नागरिकांनी डासांची उत्पत्तीस्थळं नष्ट करावीत तसंच स्वच्छतेची काळजी घेऊन बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, असं आवाहन महापालिकेनं केलंय.   


मुंबईत आज किती रुग्ण? 


राज्यात दिवसभरात एकूण 2 हजार 701 जणांना कोरोना झाला आहे. सुदैवाने आज एकही मृताची नोंद झालेली नाही. तर 24 तासांमध्ये 1 हजार 327 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 
 
तर मुंबईत आज (8 जून) रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केलाय. मुंबईत 1 हजार 765 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.