India Alliance Mumbai Meeting: इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची (Coordination Committee) स्थापना करण्यात आलीय. तेरा जणांचा या समितीत समावेश आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या गटातून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा समोवश करण्यात आलाय. तर काँग्रेसकडून सी. वेणूगोपाल यांना समितीत स्थान देण्यात आलंय. याशिवाय एम के स्टॅलिन, अभिषेक बॅनर्जी, हेमंत सोरेन, राघव चड्ढा, तेजस्वी यादव, जावेद खान, लल्लन सिंह, डी राजा, उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती या  तेरा नेत्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, विरोधकांच्या आघाडीचा संयोजक कोण असणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत दोन दिवसीय बैठक
मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक पार पडली. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक झाली, या बैठकीत 28 पक्षांचे नेते सहभागी झाल होते. या बैठकीत एकमताने घोषवाक्य ठरवण्यात आलं. 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया' हे घोषवाक्य घेऊन इंडिया आघाडी मैदानात उतरणार आहे. 


अशी असणार I.N.D.I.A. ची रणनीति?
देशातल्या विविध राज्यात पब्लिक रॅली काढणली जाणार आहे. रॅलीत जनतेच्या प्रश्नांवर प्रामुख्याने भर दिला जाणार असल्याचं या बैठकीत ठरवणार आहे. इंडियाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय झाला तो म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवला जाणार आहे. परस्पर सांमजस्याने जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्रपणे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी ठराव करण्यात आला. 


NDA ला सत्तेतून हटवण्याचा निर्धार
इंडिया आघाडीच्या बैठकीत एनडीएला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय 28 पक्षांनी एकत्र घेतला आहे. एकिकडे इंडिया आघाडीचा निर्धार सुरु असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार एकमागोमाग एक खेळी करत आहेत. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकराने संसदेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या बैठकीत वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक पास झालं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. तसंच लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होण्याचीही शक्यता आहे. 


वन नेशन, वन इलेक्शनसाटी समिती स्थापन
वन नेशन, वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना करण्यात आली असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CJI आणि CEC या समितीची सदस्य असतील.