मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई परिसरात सुरु असलेला पाऊस आजही बरसत आहे. आज सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या दोन तासांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून आणखी काही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, पुढील तीन तास मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत हाय टाईडचा इशारा; 'या' वेळेत समुद्रकिनारी जाणं टाळा



अशातच काहीवेळापूर्वी मुंबईत समुद्राच्या भरतीला सुरुवात झाली आहे. या काळात समुद्रात जवळपास ४,.७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत चोवीस तासांत २०० मिमी पावासाची नोंद झाली आहे. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांतील पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे हिंदमात परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पालिकेकडून सखल भागात पंपिंग मशीन लावण्यात आल्या असून पाणी काढण्याचं काम सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाबा येथे १२९.६ मिमी आणि सांताक्रुझ येथे २००.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 



तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने आज पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.