मुंबई : अदाणी ग्रुपचे अध्यक्ष (Adani Group) गौतम अदानी (Gautam Adani) यांची जगातील श्रीमंतांच्या यादीत गणना केली जाते. अदानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत (Indian Economy) मोठं विधान केलंय. भारत पुढील 8 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उभारी घेईल. तसेच 2050 मध्ये पर्यंत जागतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढील 30 वर्ष महत्त्वपूर्ण असल्याचंही अदाणी यांनी नमूद केलं. मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही भविष्यवाणी केली. (india will emerge as the 3d largest economy in the world by 2030 and 2nd largest by 2050 says adani group chairman gautam adani at mumbai)


अदाणी काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"भारताला उद्योगजकतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच देशातील तरुणांचा या प्रवासातील सहभगा आणि योगदानही महत्त्वाचं असणार आहे.  भारतात स्टार्टअपसाठी गेल्या 8 वर्षांमध्ये 50 बिलियन डॉलर इतकी फंडिग मिळाली आहे. त्यामुळे स्टार्टअप भारताच्या विकासाच्या वेगाला चालना देईल. तसेच ग्रीन एनर्जीलाही प्राधान्य द्यायला हवं. भारताच्या भविष्यासाठी सोलर पावर आणि हायड्रोजन हे 2 घटक फार महत्त्वाचे आहेत.", असंही अदाणी यांनी नमूद केलं.


केंद्र सरकारचं कौतुक


दरम्यान, अदाणींनी केंद्र सरकारचं कौतुक केलंय. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा वेगाने विकास होतोय. भारताचं स्वातंत्र्य फार काळ टिकणार नाही,  असं त्यावेळेस म्हटलं जायचं. मात्र आपण गेल्या 75 वर्षांमध्ये एक मजबूत लोकशाहीचं मॉडेल जगासमोर उभारलंय", असं अदाणी यांनी सांगितलं.