मुंबई : स्वर कोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. 28 दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. (Indian navy will paid tribute to Lata Mangeshkar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता मंगेशकर यांचे पार्थिव पेडर रोड येथील प्रभु कुंज येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. यानंतर दुपारी 4.30 वाजता त्यांना शिवाजी पार्कवर आणण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मुंबईत पोहोचणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय नौदलाकडून देखील लता मंगेशकर यांना मानवंदना दिली जाणार आहे.


2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर


लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.


राष्ट्रपती-पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. देशभरातील दिग्गज व्यक्तींकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.