Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धामुळे तिथे शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या (indian student) पालकांची चिंता वाढली आहे. भारताकडून युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रविवारी एअर इंडियाच्या पहिल्या विमानाने 240 विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण 900 विद्यार्थी मायदेशी परतली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केंद्रावर खोचक टीका केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबद्दल आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी आहे. याची माहिती आम्ही गोळा केली आहे अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.


विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. फक्त 2 विमानं आली म्हणजे सर्व विद्यार्थी परत आले असं होत नाही. युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. युक्रेनच्या शेजारील सर्व राष्ट्रांशी संपर्क करून प्रयत्न वाढवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सर्व मदत केली पाहिजे.


ऑपरेशन गंगा वाहून जाऊ नये
ऑपरेशन गंगा सुरू केले आहे.  मात्र ते ऑपरेशन गंगेत वाहून जाऊ नये. या मध्ये राज्य सरकारची भूमिका मर्यादित आहे. 20000 विद्यार्थ्यांपैकी 900 विद्यार्थी आणले म्हणजे सर्व केले असे नाही. भारताच्या भूमिकेमुळे युक्रेन आपल्या विद्यार्थ्यांना मदत करत नाहीए अशी टीका वडेट्टीवर यांनी केली आहे.


युद्धजन्य परिस्थितीत इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला. युक्रेनमध्ये 25 ते 30 हजार मुलं असून 40 किलोमीटरचा प्रवास करुन ते थंडीत उघड्यावर झोपत आहेत. केंद्र सरकारने सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज स्वयंप्रकाशित
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. शिवाजी महाराज स्वयंभू होते, त्यांना गुरूची गरज नव्हती, राजांचे वडील ही सैन्यात होते, ते ही राजांचे गुरूच होते. काही लोकं परप्रकाशित असतात. मात्र, शिवाजी राजे स्वयंप्रकाशित होते. रामदास स्वामींचे मार्गदर्शन मिळाले, मात्र ते नसते तर शिवाजी घडले नसते असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. राज्यपालांचा ज्ञान हिमालयाचं असेल.. त्यांच्या वक्तव्याने शिवप्रेमींचे मन दुखावले गेले आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.