मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुरूवारी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालणा-या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानच्या सहयोगाने तयार होत असलेल्या या प्रोजेक्टला साधारण ५ वर्ष लागतील. २०२२ पासून प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळेल. सध्या जगातल्या ऑस्ट्रिया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, स्वीडन, तायवान, तुर्की, यूनायटेड किंगडम, अमेरिका आणि उझ्बेकिस्तान या देशांमध्ये हायस्पीड ट्रेन चालवल्या जातात. पाच वर्षांनी भारताचं नावंही या यादीत येईल. यात जपानची बुलेट ट्रेन जास्त सुरक्षित मानली जाते.  


जगभरात हायस्पीड ट्रेनसाठी लागणारा सर्वात लांब ट्रॅक चीनमध्ये आहे. चीनकडे साधारण २२ हजार किलोमीटर लांब हायस्पीड रेल्वे ट्रॅक आहे. जगात सर्वात फास्ट ट्रेनही चीनमध्येच चालते. साधारण ३५० किमी प्रति तास वेगाने इथली ट्रेन धावते. साढे चार तासात ही ट्रेन १२५० किमीचं अंतर पार करते. 


भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची खासियत -


वेग - या बुलेट ट्रेनचा स्पीड जास्तीत जास्त ३५० किमी प्रति तास असेल. 


क्षमता - सुरूवातीला या ट्रेनला केवळ १० डबे असतील. यात ७५० प्रवाशी बसतील. 


मार्ग - बुलेट ट्रेनचा मार्ग साबरमती रेल्वे स्टेशन ते मुंबई-बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्सपर्यंत असेल. हे एकूण अंतर ५०८ किलोमीटरचं असेल. महाराष्ट्रात या ट्रेनचा १५६ किमी आणि गुजरातमध्ये ३५१ किमी लांब मार्ग असेल. 


स्टेशन - सुरूवातीला ही ट्रेन केवळ चार स्टेशनवर थांबेल आणि दोन तास सात मिनिटांमध्ये अहमदाबाद अंतर पार करेल. नंतर स्टेशन वाढवून १२ करण्यात येतील. त्यात मुंबई, ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भडोच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे. 


ट्रॅकची खासियत - एकूण ट्रॅकपैकी ९६ टक्के म्हणजे ४६८ किमी एलिवेटिड असेल, ६ टक्के मार्ग अंडरग्रांऊड असेल. तर २ टक्के म्हणजे १२ किमी मार्ग जमीनीवर असेल. 


समुद्राखाली मार्ग - २१ किमीचा सर्वात लांब टनल आणि ७ किमी समुद्राखाली हा मार्ग असेल. ट्रॅक जमिनीपासून २० मीटर म्हणजे साधारण ७० फुट वर एलिवेडेट असतील. 


खर्च - या प्रोजेक्टसाठी एकूण १.०८ लाख कोटी रूपये खर्च होणार आहेत. त्यातील ८८ हजार कोटी रूपये जपान कर्ज देणार आहे. बाकी सगळा खर्च भारत सरकारच्या तिजोरीतून होणार आहे. 


रोजगार - ४ हजार कर्मचा-यांच्या ट्रेनिंगसाठी वडोदरामध्ये हायस्पीड रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्य़ूटची स्थापना करण्यात आली आहे. या प्रोजेक्टमध्ये १६ हजार अप्रत्यक्ष रोजगारांची शक्यता आहे. 


पुढील प्लॅनिंग - सरकारने पुढील टप्प्यात दिल्ली-चंडीगढ, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई, दिल्ली-नागपूर, मुंबई-चेन्नई आणि मुंबई-नागपूर या मार्गांवर बुलेट ट्रेन चालवण्याची रूपरेषा आखली आहे.