Mumbai Ahmedabad Bullet Train Route: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. 2026 पर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनमुळं मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांतील अंतर फक्त 2 तासांत येणार आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2026पर्यंत तयार होईल आणि सूरतपर्यंतच्या एका सेक्शनपर्यंत धावणार आहे. स्थानकांच्या कामांना गती मिळाली आहे. तर, समुद्रातील बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्यातून ट्रेन ठाणे ते मुंबईपर्यंत पोहोचेल. रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद-मुंबई कॉरिडोर सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांतील अंतर 508 किमीने कमी होऊन 2 तासांवर येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, 1.08 लाख कोटी रुपयांची गुंतवणुक या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या बुलेट ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. या रेल्वे मार्गावर बुलेट ट्रेनचचा वेग 320 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे. कॉरिडॉरमध्ये स्लॅब ट्रॅक सिस्टमची सुविधा असणार आहे. हा पद्धत पहिल्यांदा भारतात वापरली जाणार आहे. 


7 किमी लांबीच्या समुद्री बोगद्यातून ट्रेन धावणार 


बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी 24 पुल आणि सात बोगदे सताय केले जात आहेत. कॉरिडोरमध्ये 7 किमी लांबीचा समुद्री बोगदा देखील असणार आहे. समुद्राच्या पोटातून ही बुलेट ट्रेन धावणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानक असणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद मार्गावर भारतातील एकमेव स्वीकृत हायस्पीड रेल्वे प्रकल्प आहे. जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबई-अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड रेल्वे तयार करुन उच्च फ्रिक्वेंन्सी मास ट्रान्झिट सिस्टम विकसीत करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे. ज्यामुळं भारतात गतिशीलता वाढेल आणि आर्थिकदृष्ट्या देखील प्रगती होईल. 


देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये 690 प्रवासी प्रवास करु शकतात. म्हणजेच एका ट्रेनमध्ये 10 कोच असू शकतात. तर, एका बुलेट ट्रेनमध्ये तीन प्रकारच्या आसनक्षमता असतात. सगळ्यात महागडे तिकिट भाडे फर्स्ट क्लासचे असेल. यात एकूण 15 सीट असणार आहेत. त्याचबरोबर बिझनेस क्लास असेल त्यात 55 प्रवासी असतील. स्टँडर्ट क्लासमध्ये 620 प्रवासी असतील.