मुंबई : राज्यात आजही मानवाला न शोभणार धक्कादायक प्रकार सुरु आहे. पंढरपुरात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची अमानवीय प्रथा आजही सुरुच आहे. याबाबत विरोधकांनी विधानसभेत आबाज उठवला. ही प्रथा केव्हा बंद होणार असा थेट हल्लाबोल चढवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पंढरपुरात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची अमानविय प्रथा सुरु असल्याची कबुली आज विधानसभेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. ही प्रथा कायमस्वरुपी बंद झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेत  करण्यात आली.


पंढरपुरात कायमस्वरुपी शौचालये बांधण्याची मागणी विरोधकांनी केली. पंढरपूर यात्रेदरम्यान फॅब्रिकेटेड शौचालयांची व्यवस्था करुनही ती कमी पडत आहेत. सरकारने याविरोधात कायदा करुनही मैला वाहून नेण्याचे काम पंढरपुरात सुरुच असल्याची बाब सभागृहाच्या लक्षात विरोधकांनी आणून दिली.