मुंबई : तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय नौदलात  कलवरी या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएस कलवरीचं पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शानदार लोकापर्ण करण्यात आले.


मोदी यांच्या हस्ते पाणबुडीचे राष्ट्रार्पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामर्थ्यशाली असणा-या भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस कलवरी या पाणबुडी ही सामील झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अद्ययावत पाणबुडीचे आज राष्ट्रार्पण केलं. कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलासाठी बांधली आहे. 


सहा पाणबुड्या भारतीय नौदलात 


अशा प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे. फ्रान्सच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारला आहे.चीन आणि पाकिस्तानकडून समुद्रमार्गे होणारी घुसखोरी मोडून काढण्यासाठी स्वदेशी बनावटीची आयएनएस कलवरी ही पाणबुडी आजपासून कार्यरत झालीय. 



भारत महत्त्वाची भूमिका


शत्रूची नजर चुकवून अचूक लक्ष्य भेदू शकणारी कलवरी चीन आणि पाकला चांगलीच महागात पडणार आहे. यावेळी समुद्रमार्गे सुरू असलेला दहशतवाद असो किंवा पायरसी, तस्करी, बेकायदेशीर मासेमारी; या आव्हानांशी लढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. 


गेल्या तीन वर्षांत देशाच्या सुरक्षेशी संबंधित व्यवस्थेत बदल होण्यास सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आयएनएस कलवरी हे भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी वाढत असल्याचं उत्तम उदाहरण असल्याचंही ते म्हणाले.