अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीची अद्ययावत आय.एन.एस. खांदेरी ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते खांदेरी देशसेवेत रूजू झाली. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


नावामागची कहाणी


तब्बल २० महिन्यांच्या समुद्रातील चाचण्यांनंतर कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. मुंबईकर टोपीकरांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 'खांदेरी' या किल्ल्यावरून या पाणबुडीचं नामकरण करण्यात आलंय.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत

 


अफाट क्षमता


१६०० टनाहून अधिक वजानाची पाणबुडी ही डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्यांमध्ये जगात उत्कृष्ट समजली जात आहे. समुद्रात सलग ५० दिवस संचार करण्याची पाणबुडीची क्षमता आहे. पाणतीर म्हणजेच टॉर्पेडोज हे पाणबुडीचे प्रमुख अस्त्र असलं तरी पाण्याखालून जमिनीवर किंवा समुदाच्या पृष्ठभागावर असलेल्या शत्रुपक्षाच्या युद्धनौकांवर अचुक मारा करणारी 'एक्सॉट' जातीची क्षेपणास्त्रांमुळे पाणबुडीच्या मारक क्षमतेते मोठी भर पडली आहे.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत

 


देशातील सर्वात मोठा 'ड्राय डॉक' 


मुंबईच्या नौदल तळामध्ये भर समुद्रात ड्राय डॉक उभारण्यात आला असून अशा प्रकारचा हा देशातील पहिला ड्राय डॉक ठरला आहे. २८१ मीटर लांब, ४५ मीटर रुंद आणि १७ मीटर खोल अशी या 'ड्राय डॉक'ची रचना आहे. यामुळे भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रमादित्य'ची डागडुजी या ड्राय डॉकमध्ये करणे शक्य होणार आहे, अशी माहिती नौदल प्रकल्प विभागाचे महासंचालक संदीप नौथानी यांनी दिलीय. 


आता यापुढे कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी 'आयएनएस करंज' लवकरच नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.