INS Vikrant Fund Case : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. सेव्ह विक्रांत मोहिमेत अपहार केल्याच्या आरोपाखाली सुरू असलेली चौकशी बंद करण्यात आलीय. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सी समरी दाखल करत प्रकरण बंद केलं आहे. किरीट आणि नील सोमय्यांविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचं मुंबई पोलिसांनी कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumabi High Court) किरीट आणि नील सोमय्या यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आमचा मनुसख हिरेन करण्याचा प्रयत्न'
दरम्यान, या प्रकरणी बोलताना सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही अशी प्रतिक्रिया नील सोमय्या यांनी दिली आहे. थोडी भीती होती की महाविकास आघाडीच्या काळात आमच्यावर गुन्हा दाखल करून आमचा मनसुख हिरेन (Mansukh Hiren) होईल परंतु आमचा पक्ष आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला त्यामुळे आम्ही या सर्वातून बाहेर पडू शकलो अशी प्रतिक्रिया नील सोमय्या यांनी दिली आहे.


संजय राऊत यांनी दिला इशारा
विक्रांत निधी अपहार प्रकरणी किरिट आणि नील सोमय्या यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला आहे. 2024 मध्ये हिशोब केला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकार बदलल्यानंतर ही अपेक्षित गोष्ट होती, याचा अर्थ विषय संपलेला नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी विक्रांत मोहिमेसाठी पैसे गोळा केले हे सर्वांनी पाहिलं आहे, मग तो एक रुपया असो कि 50 कोटी, पैशांचा अपहार झाला आहे, गोळा करण्यात आलेले पैसे राजभवनात पाठवले असं सांगण्यत आलं पण राजवन म्हणतंय पैसे आलेच नाहीत, हा भ्रष्टाचाराचा मोठा पुरावा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. 


किरीट आणि नील सोमया यांना आज क्लीन चिट मिळाली आहे, पण कोणतंही सरकार कायमस्वरुपी नसतं, 2024 ला सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.


काय होतं विक्रांत निधी अपहार प्रकरण?
INS विक्रांत युद्धनौकेवर युद्धस्मारक बनवण्यासाठी निधी गोळा करण्यात आला होता. या निधीततब्बल 58 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.