मुंबई : सेव्ह विक्रांत (INS Vikrant) कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.  त्यामुळं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात (High Court) अपील करणार आहेत. तर त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

INS विक्रांत बचाव मोहिमेसाठी गोळा केलेल्या निधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 


संजय राऊत यांचं सोमय्यांना आव्हान
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना आव्हान केलं आहे. आम्ही कधीही राजकीय सूडापोटी आरोप करत नाही. तुमच्या मनात भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे, तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी जाताय, तुम्ही पळताय, भूमीगत होताय, तुम्ही इतके महात्मा आहात, आतापर्यंत अनेकांच्या भ्रष्टाचारावर हल्ले केलेले आहे, तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे, कायद्यापासून पळू नका, आता तुम्हीच पळताय, xxx पाय लावून, असं पळू  नका, माझे त्यांना आव्हान आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


पोलीस तपास करत आहेत, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, हे संपूर्ण प्रकरण राजकीय सुडापोटी केलेलं नाहीए. त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीए. निवृत्त लष्कर अधिकाऱ्याने ही तक्रार दाखल केली आहे. कोणी किती पैसे गोळा केले, पैसे गोळा करुन त्याचा काय विनियोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. ज्या प्रकारचे आरोप गेल्या काही वर्षांपासून भाजपची लोकं आमच्यासारख्यांवर करतायत. हा आरोप त्या प्रकारचा नाहीए, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 



हा स्पष्ट आरोप आहे, 58 कोटींचा आकडा समोर आलेला आहे. तुम्ही म्हणताय 11 हजार रुपये. हा पोलीस तपासाचा भाग आहे. पण अनेक प्रकरणं समोर येतील, लोकांना ब्लॅकमेल करुन, ईडीच्या धमक्या देऊन, थायलंड, बँकॉकमध्ये कोणाकडून आणि किती पैसे जमा केले ते लवकरच समोर येईल असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला आहे. 


आम्ही कंबरेखाली वार करत नाही. आमच्यावर संस्कार आहेत, कोणाच्या कुटुंबापर्यंत जात नाही, पण सुरुवात तुम्ही केलेली आहे तरी आम्ही संयम बाळगला आहे. पण परदेशात पैसे कोण स्विकारत होतं, धमक्या देऊन हे सुद्धा बाहेर येईल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.