प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : सध्याच्या तरुणाईत सोशल मीडियावरची (Social Media) प्रचंड क्रेझ आहे. मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे आणि ते सोशल मीडियावर शेअर करायचे. पण हे रिल्स (Reels) बनवण्यासाठी आजची तरुण पिढी वाट्टेले ते करायला तयार आहेत. अगदी जीवाची पर्वाही केली जात नाही. केवळ लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी तसंच सोशल मीडियावर झटपट लोकप्रिय होण्यासाठी हा हट्टहास असतो. पण अनेकवेळा त्यांच्यात हातातून गैरकृत्यदेखील केलं जातं. असाच एक धक्कादायक प्रकार वसईत (Vasai) समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिलालेखाला लावली आग
इंस्टाग्रामवर रील बनवून व्ह्यूज मिळविण्याच्या नादात एका तरुणाने ऐतिहासिक वसई किल्ल्यातील (Vasai Fort) एका शिलालेखालाच आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला होता.  या संतापवाण्या प्रकारावर किल्ले प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी पुरातत्व विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर वसई पोलीस ठाण्यात या तरुणावर विघातक कृत्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल  करण्यात आला आहे हाशीम शेख असं या तरुणाचं नाव आहे..


दुर्गप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप
हाशीम शेखने वसई किल्ल्यातील फ्रँसीस्कन चर्च मध्ये एका शिलालेखावर इंस्टाग्रामवर व्हिडीओ (Instagram Video) बनविण्यासाठी थेट आग लावली. एस आकारात पेट्रोलच्या साहाय्याने पेटवून देऊन त्याने व्हिडीओ तयार करून इंस्टाग्राम वर टाकला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर नागरिकांसह दुर्गप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला. ऐतिहासिक वसई किल्ल्याची विटंबना करणाऱ्या या तरुणावर कठोर कारवाई व्हावी यासाठी वसईतील इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्व विभागाकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवत वसई किल्ल्यात विघातक कृत्य करणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी केली होती.


त्याची दखल घेत पुरातत्व विभागाचे वसई किल्ला संवर्धक सहाय्यक कैलास शिंदे यांनी  वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police Station) या तरुणावर गुन्हा केला आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातन वास्तू जागा अवशेष अधिनियम कलमान्वये त्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


वसई किल्ल्याला (Vasai Fort)  दररोज  शेकडो पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यात पर्यटकांमार्फत (Tourist) कोणतेही विघातक किंवा इतर वाईट कृत्य होऊ नये आणि किल्ल्याची नासधूस होऊ नये म्हणून पुरातत्व विभाग यावर नियंत्रण ठेवते. मात्र नजर चुकीने अनेक हौशी तरुणांमार्फत विविध विघातक कृत्य घडत असल्याचे अनेक प्रकार याआधीही वसई किल्ल्यात घडले आहेत.