मुंबई : ठाण्यात उष्णतेची लाट धडकणार आहे. शनिवारी पारा अचानक  38.9 अंशांवर झेपावलेला. तापमानात आणखी वाढ होणार आहे. मुंबईत तापमानाचा पारा 41 अंशांचा विक्रम मोडीत काढण्याचा इशारा देण्यात आलाय.  दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मार्च महिना सुरू झाल्यापासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात तापमान वाढ सुरू झाली आहे. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे वातावरणाचं गणित आणखी बिघडलंय. राज्यात मुंबई ठाण्याशिवाय डहाणू, जव्हार, सुरगाणा, नवापूर, नंदूरबार, अकराणी, तळोदा, अक्कलकुवा तसंच संपूर्ण विदर्भात तापमानात मोठी वाढ होऊ शकते. 


मुंबई तापली


शनिवारी उन्हाच्या कडाक्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही झाल्याचे दिसून आले. शनिवारी मुंबईचे तापमान 38.9 अंश इतके होते. हे तापमान राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. 
नागपूर, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, चंद्रपुरपेक्षाही मुंबईचा पारा अधिक नोंदवला गेला. 


वाढत्या तापमानामुळे दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिलाय.