मुंबई : प्रत्येक जण आपल्या मासिक कमाईमधून पैसे वाचविण्याचे काम करीत असतो.  तसेच पैसे वाचवताना देखील भरपूर कष्ट घ्यावे लागतात.  करोडपती होण्यासाठी जर तुम्ही मोठ्या प्रमाणात पैशांची साठवण करत असाल, तर बाजारात तुमच्यासाठी काही गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत.  बाजारात कमी जोखीमेपासून मोठ्या जोखीमेपर्यंत योजना उपलब्ध आहेत. हे सर्व तुम्ही किती पैशाची गूंतवणूक करत आहेत, यावर अवलंबून असते. प्रतिदिन ७८६ रुपयांची  गुंतवणूक तुम्हाला १ कोटीच्या जवळपास रक्कम मिळवून देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


१५ वर्षात मिळणार १ कोटी 



उदारणार्थ, आपण सुमारे 30 वर्षांचे असल्यास दररोज रु. 786 पर्यंत बचत करू शकता, आणि 45 वर्षांपर्यंत आपल्या खात्यात रू. १ कोटी पर्यंत बचत करू शकता. ही गणना दरवर्षी किमान 10% व्याजावर आधारित असते. 


 


कोठे मिऴणार १० पेक्षा अधिक व्याजदर 



तुम्ही शेड्यूल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असाल, तर ते अधिक चांगले ठरेल. प्रतिदिन 786 रुपयांची (दरमाही २३५८० रुपये, १५ वर्षापर्यंत) गुंतवणूक तुम्हाला १ कोटी १५ लाख ९८ हजार ८२० रुपये मिऴवून देणार आहे. हा व्याजदर (ROI) ऑनलाइन कॅल्क्युलेटरमधून घेतला जातो.


 


कमी जोखीमेतील गुंतवणूक  



बाजारात अशा काही गुंतवणूक आहेत, त्या कमी जोखीमाच्या आहेत. अर्थात, आपले पैसे बाजारपेठातील मोठ्या हालचाली नंतरही सुरक्षित राहतील.


 


अधिक जोखीम अधिक फायदा



असे काही फंड आहेत जे मोठ्या जोखीमचे असतात. जोखीमवाल्या गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवण्याची शक्यता असते. तसेच गुंतवणुकीतील पैशात तोटाही निर्माण होऊ शकतो.