मुंबई : आपलं भविष्य उत्तम आणि आनंददायी असावे, असे प्रत्येकाला वाटते. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. उतार वयात कोणाकडे हात पसरावे लागू नये, यासाठी प्रत्येक जण ही गुंतवणूक करतो. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करतो. काही जण विम्यात, दागिन्यात, घरात, शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही नॅशनल पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) गुंतवणूक करण्याचे ठरवत असाल, तर तुमचा निर्णय अगदी योग्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनपीएस म्हणजेच 'नॅशनल पेन्शन योजना' ही अनेक अर्थाने फायदेशीर आहे. करांनुसार ही योजना ईपीएफ आणि पीपीएफ सारखीच आहे. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त करण्यात आली आहे. पीएफ योजनेत १ लाख ५० हजारपर्यंत रक्कम ही करमुक्त असणार आहे. तसेच या योजनेतून पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर आकारले जात नाही. आतापर्यंत एनपीएस योजनेतून निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही पूर्णपणे करमुक्त नव्हती. निवृत्तीनंतर एनपीएस योजनेतून काढलेल्या एकूण रकमेच्या, ४० टक्के एन्युएटी खरेदी करणे बंधनकारक होते. एन्युइटी म्हणजे एखाद्याने एका कंपनीसोबत केलेला करार. हा करार अनेकदा विमा कंपनी सोबत केलेला असतो. या रक्मकेवर आधी कर द्यावा लागायचा पण आता करमुक्त करण्यात आला आहे. पण आता एनपीएस ही योजना पीपीएफसारखी सूट म्हणजेच eee श्रेणीत आली आहे. 


म्युच्युअल फंडपेक्षा एनपीएस फायदेशीर ? 


खासगी क्षेत्रातील कर्मचारीसुद्धा एनपीएस योजनेत गुंतवणूक करु शकतात. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एनपीएसमधील 'हाय इक्विटी' पर्याय निवडून ६० वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. निवृत्तीनंतर मिळणारी सर्व रक्कम ही करमुक्त असणार आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या कुमार यांच्या म्हणण्यानुसार, म्युच्युअल फंडदेखील निवृत्तीसाठी गुतंवणुकीचा उत्तम पर्याय आहे. पण शून्य टक्के कर परिस्थितीत एनपीएस हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.


यासाठी फायदेशीर एनपीएस  


कुमार यांच्यानुसार, निवृत्ती काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी खूप वेळ असावा लागतो. यासाठी कायदा-सुव्यवस्था स्थिर असणे गरजेचे आहे. जास्त काळाच्या अवधीसाठी एनपीएसच्या नियामांमध्ये स्थिरता असेल. याचे मुख्य कारण हे आहे की, या एनपीएस योजनेत सरकारी कर्मचारी देखील आहेत. याशिवाय भविष्यात, ग्राहकाने केलेल्या गुंतवणूकीत जर बदल करायचे असेल तर, ते गुंतवणूकदारासाठी हितकारक असेल. हीच परिस्थिती म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये नाही, असे एनपीएसचा इतिहास सांगतो. नुकतेच इक्विटी म्युच्युअल फंडावर आणि शेअर्सवर दीर्घकाळ कॅपिटल गेन टॅक्स लावला होता.