मुंबई : गेले अनेक दिवसांपासून फरार असलेला आंतरराष्ट्रीय  बुकी सोनू जालान याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण न्यालयालय परिसरातून अटक केली. सोनू जालानवर आता मक्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आलेय. सोनूने खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आलाय. दरम्यान, कल्याण येथे सोनू जालान हा त्याच्या साथीदाराला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यासाठी सोनू जालान याने सट्टा लावल्याचे समोर आलं आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने यापूर्वी ५ जणांना अटक केल्यानंतर आता सोनू हा सहावा आरोपी आहे. आयपीएलमध्ये सट्टेबाजीप्रकरणी सोनूचा मुलगा यालाही अटक करण्यात आलेय. त्याचे काही माफिया लोकांशी संबंध असल्याचे समजत आहे. यामध्ये त्यात दाऊद इब्राहिम कासकर यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले निरीक्षक राजकुमार म्हणाले की, या प्रकरणाचा तपास गेल्या पाच-सहा वर्षांपासून चालू आहे आणि ५०० ​​ते ६०० कोटींच्या गैरव्यवहाराची एक घोटाळा होण्याची शक्यता आहे. 


राजकुमार म्हणाले की, सोनूकडून काही छायाचित्र आणि व्हिडिओ हाती मिळाले आहेत. ज्यामध्ये इतर मोठ्या चित्रपटांच्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात, त्यांना समन्स देखील पाठविले जाऊ शकतात. पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्या मते, आयपीएलच्या संपूर्ण घोटाळ्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, जयपूर आणि नवी दिल्ली येथून सट्टेबाजांची नावे आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीझन दरम्यान बुकी सोनू जालानच्या अटकेनंतर हा गौप्यस्फोट झाला आहे. अरबाज खान साधारण ३ कोटी रुपये सट्टेबाजीत हरल्याची चर्चा आहे. आयपीएल २०१६ च्या सीझनमधील २ मॅचमध्ये सावळा गोंधळ झाल्याचा पोलिसांना संशय आहे. व्यावसायिक हनीफ खान, बुकी सोनू आणि अरबाज खान यामध्ये मध्यस्थी असल्याचे कळते.